ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कासार्डेत ४ डिसेंबरला ज्युदो निवड चाचणीचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कासार्डेत ४ डिसेंबरला ज्युदो निवड चाचणीचे आयोजन.

प्रकाशन: 03 Dec 2022 05:12 AM
वाचन संख्या 55

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशन मार्फत दि.४ डिसेंबर २०२२रोजी स.९.३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा ज्युनिअर गटाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुकांनी या निवड चाचणीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेला सहभागी होण्यासाठी
१)मुळ जन्मदाखला व तीन झेरॉक्स
२) मुख्याध्यापक सहीनिशी शाळेच्या लेटरहेड वर फोटो सह खेळाडुचे माहिती असलेले पत्र
३),मुळ आधारकार्ड आणि तीन झेरॉक्स
हे तीनही दाखले अनिवार्य आहे याची नोंद सर्व खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी घ्यावी.तसेच खेळाडुंनी सोबत तीन आयडी फोटो घेऊन यावे.
ज्यांची जन्मतारीख २००२ते २००७ मध्ये आहे यांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल.
१८वर्षाखालील खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालकांचे संमत्तीपत्र जिल्हा संघटनेकडे देणे अनिवार्य आहे.अन्यथा संबंधित खेळाडूंना या निवड चाचणीत खेळता येणार नाही याची नोंद घ्यावी.
तरी जिल्ह्यातील इच्छुक ज्युदो खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड आणि अभिजीत शेट्ये यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स