ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्ह्यातील युवकांना रोजगारासाठी मुंबई गाठायची गरज नसेल अशा सोयी उपलब्ध करणार : ब्रिगेडियर सुधीर सावंत
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्ह्यातील युवकांना रोजगारासाठी मुंबई गाठायची गरज नसेल अशा सोयी उपलब्ध करणार : ब्रिगेडियर सुधीर सावंत

प्रकाशन: 02 Dec 2022 09:43 AM
वाचन संख्या 59

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची पत्रकार परिषद; जिल्हाप्रमुख संजय आंग्रेनीही केला जनतेसाठी प्राधान्याने विकास कामांचा पुनुरोच्चार.

कणकवली | प्रतिनिधी : ‘बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या’ ध्येयधोरणांमध्ये प्रत्येक गावात विकासाची कामे आणि रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. समृद्ध आणि आनंदी गाव ही योजना आपण राबविणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी सकारत्मकता दाखवली आहे. महिला बचतगटांना ५० लाखापर्यंत निधी उपलब्ध करुन देण्याचाही आमचा प्रयत्न आहे.. गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता असे अभियान पक्षामार्फत राबविण्यात येणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते, ब्रिगेडियर सुधीर सावंत व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी सांगितले. कणकवलीत काल संपन्न झालेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना पक्ष’ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाप्रमुख एम. एम. सावंत, शेखर राणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, समन्वयक सुनिल पारकर, भूषण परुळेकर, भास्कर राणे, शरद वायंगणकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमेरिका येथून आलेली टीम आहे, त्यांनी १ हजार एकर बांबू लावला आहे. यात कोट्यवधी रुपयांचा लाभ झाला आहे. त्यामुळे बांबू लागवड करण्यासाठी विशेष मोहीम
जिल्ह्यात राबविली जाणार आहे. गावाच्या समृध्दीसाठी करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असून त्यामार्फत रोजगार निर्मितीकडे लक्ष दिले जाणार आहे. फळप्रक्रिया उद्योग निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी विक्री व्यवस्था निर्माण केली पाहिजे तरच गावचा विकास होईल. आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काम केलं पाहिजे. प्रत्येक गावात क्रीडा संकुल उभारण्याची गरज आहे. तरुणांना मुंबईत रोजगारासाठी जावे लागणार नाही, अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत, असे सुधीर सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यात युतीचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच त्याबाबत आम्ही आकडेवारी जाहीर करणार आहोत. आमच्या पक्षात प्रवेश केले जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही लढत आहोत, याबाबत लवकरच धोरण आम्ही जाहीर करणार आहोत. अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर आम्ही आमचे सरपंच व सदस्य किती लढत आहेत, याची माहिती जाहीर करणार आहोत, असे संजय आग्रे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात फोंडाघाट येथील संजना हळदिवे यांनी प्रवेश केला. त्यांना पुष्पगुच्छ व भगवा झेंडा देत सुधीर सावंत व वर्षा कुडाळकर यांनी स्वागत केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स