भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश ; बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांनी दिली माहिती.
ब्युरो न्यूज | ओरोस : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा जवळ नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना आर्थिक लाभाची मूळ कागदपत्रे ऑनलाईन सादर केल्यानंतरही मंडळ कार्यालयाकडुन कामगारांना जिल्ह्याच्या ठिकाणी बोलावून मूळ कागदपत्रे तपासणी केली जात होती. यामुळे कामगारांना नाहक आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. कामगार मंडळाच्या या अनावश्यक वेळकाढू प्रक्रियेला भारतीय मजदूर संघाने कडाडून विरोध केल्यानंतर, कामगारांना बोलावून मुळ कागदपत्रे तपासणीची अट मंडळाने रद्द केल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष श्री. हरी चव्हाण यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)