ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दोडामार्ग शहरात पतंजली योग वर्गाला आरंभ.

दोडामार्ग शहरात पतंजली योग वर्गाला आरंभ.

प्रकाशन: 01 Dec 2022 12:49 PM
वाचन संख्या 68

बांदा | राकेश परब : निरामय आरोग्यासाठी प्रयत्नशील असणार्या सुप्रसिद्ध ‘पतंजली योग समिती’, सिंधुदुर्ग मार्फत दोडामार्ग शहरामध्ये आज, श्री सिद्धिविनायक मंदिर येथे पतंजली योगवर्ग चालू करण्यात आला.


या वर्गाचे उद्घाटन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते झाले
अध्यक्ष शरद मणेरीकर यावेळी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांमध्ये भारत स्वाभिमान सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी महेश भाट,पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर , रावजी परब, प्रकाश रेडकर, सर्वानंद दळवी, श्रवण कुमार राज पुरोहित, दयानंद नाईक, प्रभाकर राठोड, सिमा प्रसादी, नर्मदा पटेल यांचा विशेष समावेश होता.
दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर सुरवातीला श्री. शेखर बांदेकर यांनी योग वर्ग घेतला. सूर्यनमस्कार, योगासन, असा अभ्यास केला गेला. उद्यापासून योग वर्ग सकाळी ५:३० ते ७ या वेळेस हा वर्ग दररोज सुरू राहील.
शरद मणेरीकर यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर हॉल मोफत उपलब्ध करून दिला. योगाभ्यास करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे सर्व दोडामार्ग वासीयांनी या योग वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी यावेळी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स