एम.पी.एस.सी. ची लिपिक व टंकलेखक भरतीच्या तारखांची घोषणा.
सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना दिले आहेत. त्यामुळे लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एमपीएससीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. जानेवारीत लिपीक-टंकलेखक पदासाठी एमपीएससीद्वारे निघणारी जाहिरात आजपर्यंतच्या पदभरतीतील सर्वांत मोठी जाहिरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थीनी सुवर्णसंधी समजून एप्रिलच्या परीक्षेची तयारी करावी. लिपीक टंकलेखक पदासारख्या अन्य पदभरती देखील एमपीएससीने राबवावी, यासाठी संघटना आग्रही आहे असे महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांनी म्हटले आहे .
१५ डिसेंबरपर्यंत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त न झाल्यास सन २०२३ मध्ये संबंधित विभागाची पदे भरायची नाहीत, असे समजण्यात येईल. तसेच स्पर्धा परीक्षांच्या सन २०२३ च्या अंदाजित वेळापत्रकामध्ये संबंधित विभागातील रिक्त पदांचा समावेश करण्यात येणार नाही. परिणामी, लिपीक-टंकलेखक भरतीसाठी सन २०२३ मध्ये आयोगास भरती प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही, असेदेखील आयोगाने स्पष्ट केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)