ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ग्रा.पं. निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे गावगावातील अस्तित्व दिसेलच ; समन्वयक व निरीक्षक सुनील पारकर यांचा विश्वास.

ग्रा.पं. निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे गावगावातील अस्तित्व दिसेलच ; समन्वयक व निरीक्षक सुनील पारकर यांचा विश्वास.

प्रकाशन: 30 Nov 2022 10:07 AM
वाचन संख्या 69

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने तयारी केली होती. मात्र या निवडणुकीत भाजपशी युती करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याने एक पाऊल मागे येऊन उमेदवारीबाबत आम्ही तडजोडी करणार आहोत. या दृष्टीने मालवण तालुक्यातील गावागावातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या भागातील दोन्ही पक्षाच्या ताकदीनुसार उमेदवार ठरविले जातील.
आपला पक्ष कुठेही कमी नसून प्रत्येक गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद आहे. ग्रा. प. निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गावागावातील अस्तित्व दाखवून देऊ व ते दिसेलच असा विश्वास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मालवण तालुका निरीक्षक सुनील पारकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर राणे, कणकवली समन्वयक व मालवण तालुका निरीक्षक सुनील पारकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, अरुण तोडणकर, ऋत्विक सामंत, नीलम शिंदे, नेहा तोडणकर, निकीता तोडणकर, कविता मोंडकर, स्वप्नाली माळकर, गोपाळ शेलटकर, राजा तोंडवळकर, शेखर तोडणकर, सागर घाडगे आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी सुनील पारकर म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्यात युती होत असल्याने त्या त्या गावातील स्थानिक पातळीवर तडजोडी करण्यात येतील. भाजपकडून माजी खासदार निलेश राणे व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रथम दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून त्यानंतर चर्चेतून दोन्ही पक्षाकडून कोणाची उमेदवारी कायम ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येईल. आमचा पक्ष प्रत्येक गावात आपली ताकद व अस्तित्व दाखविणार आहे. यात युतीला कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. तसेच उमेदवारी बाबत जे नाराज होतील त्यांची मनधरणी करून पक्ष संघटनेला बाधा पोहचणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असेही पारकर म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही मालवण तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या सर्व ५५ ग्रामपंचायती बाबत आढावा घेत आहोत. संघटनेची बैठक घेऊ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून गावगावातील परिस्थिती व समस्या यांची माहिती घेत आहोत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत सुसूत्रता यावी यासाठी आढावा बैठक घेत आहोत. गावागावात भेटी देऊनही माहिती घेऊन निवडणुकीचे नियोजन करण्यात येणार आहे, असेही सुनील पारकर म्हणाले.

यावेळी शिवराज्य ब्रिगेड संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती केल्याचे पत्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुनील पारकर यांनी किसन मांजरेकर यांना सुपूर्द केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मांजरेकर यांचे अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स