ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ग्रामपंचायत ऑनलाईन अर्ज भरण्याची सर्व्हर समस्या ; राज्य निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची उमेदवारांची अपेक्षा.

ग्रामपंचायत ऑनलाईन अर्ज भरण्याची सर्व्हर समस्या ; राज्य निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची उमेदवारांची अपेक्षा.

प्रकाशन: 30 Nov 2022 10:03 AM
वाचन संख्या 83

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाचा सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार यांना तासंतास ताटकळत आपला अर्ज कधी सबमिट होणार याची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रणालीमध्ये सुसूत्रता ‘आणली तरच निवडणुकीचे ऑनलाइन फॉर्म भरू शकतात अन्यथा तारीख वाढवुन तरी मिळावी अशी अपेक्षा उमेदवार व्यक्त करत आहेत.
सिंधुदुर्गात १८ डिसेंबर रोजी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ३२५ ग्रामपंचायत साठी नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी २८ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली मात्र सर्व्हर डाऊन चा फटका ग्रामपंचायत उमेदवारांना बसू लागला आहे. दिवसभरात एका केंद्रावरून चार ते पाच फॉर्म सबमिट होत आहे आणि उमेदवारांची संख्या हजारोच्या पटीत असल्याने २ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल कशी होणार असा प्रश्न पडला आहे. तसेच तहसील कार्यालयात सकाळी ११ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत त्यामुळे पुढील दोन दिवसात उमेदवारी अर्ज स्वीकारताना दमछाक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एक तर सर्वर डाऊन आणि दुसऱ्या बाजूने अर्ज स्वीकारण्यासाठी दिवसातील केवळ चार तास या गडबडीत उमेदवार मात्र हैराण झाले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रणालीमध्ये सुसूत्रता आणली तरच फॉर्म भरले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स