ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचा झंझावती गणपती दर्शन दौरा

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचा झंझावती गणपती दर्शन दौरा

प्रकाशन: 19 Sep 2021 02:18 PM
वाचन संख्या 104

एकाच दिवशी देवगड तालुक्यातील घेतले तब्बल १५० गणरायांचे दर्शन

ऋत्विक धुरी / देवगड : शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी देवगड तालुक्यातील अनेक गावातील घरगुती गणरायांचे पदाधिकाऱ्यांसोबत दर्शन घेतले. देवगड तालुक्यातील शिरगाव, तळेबाजार, जामसांडे, देवगड शहर, कुणकेश्वर, तारामुंबरी, मिठमुंबरी, खवळे महागणपती यांसह अनेक गावातील गणरायांचे दर्शन घेतले.
         संदेश पारकर यांच्या या झंझावाती देवगड दौऱ्यात एकाच दिवशी तब्बल 150 घरगुती गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी नवसाला पावणाऱ्या खवळे महागणपतीचे तसेच 370 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गोळवणकर यांच्या गणपतीचे आणि उद्योजक श्री.नंदूशेठ घाटे यांच्या देखील दर्शन श्री.पारकर यांनी घेतले.
      यावेळी श्री.पारकर यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणुन घेऊन खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले.
           यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, नगरसेविका हर्षा ठाकुर, नगरसेवक विकास कोयंडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख रवी जोगल, बुवा तारी, अमित साळगावकर, शिवसेना शहरप्रमुख संतोष तारी, युवासेना शहरप्रमुख सौरभ माने, लक्ष्मण तारी, अमोल लोके, संजय वाळके, बाळू बांधकर, दिनेश पारकर, महेंद्र भुजबळ, चिन्मया ठाकुर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स