ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही ! : आ. वैभव नाईक

शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही ! : आ. वैभव नाईक

प्रकाशन: 19 Sep 2021 02:12 PM
वाचन संख्या 158

श्रावण येथील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आडवली-मालडी मतदारसंघात श्रावणमध्ये भाजपला खिंडार

ओंकार चव्हाण / पोईप : शिवसेना संपविण्याच्या अनेक वेळा वल्गना करण्यात आल्या. शिवसेना संपविण्यासाठी अनेकांना ताकद देण्यात आली. परंतु शिवसेना कधीच थांबली नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे संपूर्ण महाराष्ट्रात चांगले काम सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोणाला मंत्री पद दिले, शिवसेनेच्या विरोधात कोणालाही कितीही ताकद पुरविली तरीही शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही शिवसेना वाढतच राहणार आहे. नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात आली परंतु त्याचा परिणाम उलट झाला. देवगड मधील दोन नगरसेवक शिवसेनेत आलेत. कणकवली तालुक्यात शिवसेनेचे दोन सरपंच निवडून आले. भाजपचे असगणी सरपंच हेंमत पारकर सह अनेक कार्यकर्ते व आता मालवण तालुक्यातील भाजप पक्षाच्या श्रावणमधील भाजप कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचे पक्षात स्वागत आहे.असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

Article image
    भाजप पक्षाचे  श्रावण  गावातील शेकडो युवा  भाजप कार्यकर्त्यांनी    शिवसेना पक्षात प्रवेश केला आमदार वैभव  नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यामध्ये योगेश परब,महेश मधुकर परब,संजय परब,दिपेश परब,मनोज पाडावे,विवेक धुरी,भुषण परब, भालचंद्र परब,सचिन परब, कृष्णा परब,विशाल परब,महेश परब,संतोष परब,सुमीत परब,प्रथमेश परब,दिक्षात परब,उमेश परब,संकेत परब,संतोष परब,मंदार परब,शंकर परब,आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. 
             कितीही जन आशीर्वाद झाल्या तरी आडवली-मालडी विभाग भगवामय केल्याशिवाय राहणार नाही. भाजपाला असे अनेक धक्के येत्या काळात देण्यात येणार आहेत असे   यावेळी विभाग प्रमुख बंडू चव्हाण यांनी सांगितले. 

          यावेळी शिवसेना , विभाग प्रमुख बंडू चव्हाण, शिवसेना उप तालुकाप्रमुख बाबा सावंत माजी विभाग प्रमुख दीपक राऊत, विभाग संघटक संतोष घाडी, उपविभागप्रमुख प्रवीण परब, दुलाजी परब, नाना गुरूजी विजय पालव  आदींसह शिवसैनिक उपस्थित

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स