६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उद्या अंतिम नाटक "संकासुरा हे महावीरा".
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उद्या मंगळवारी दिनांक २९/११/२०२२ रोजी संध्याकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अक्षरसिंधु साहित्य कलामंच कणकवली तर्फे दोन अंकी नाटक ‘संकासुरा हे महावीरा’ सादर करणार आहेत.
या नाटकाचे तिकीट दर अनुक्रमे रुपये १५/- आणि १०/- असे असून तिकिट विक्री ६ वाजल्यापासून नाट्यगृहात सुरु असणार आहे.
६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची चुरस सध्या वाढत जात असून नाटकांबद्दल नाट्य रसिकांची उत्कंठा वाढत चालली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)