ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पाडलोस केणीवाडी येथे भरवस्तीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला….!

पाडलोस केणीवाडी येथे भरवस्तीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला….!

प्रकाशन: 28 Nov 2022 08:58 PM
वाचन संख्या 69

शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण.

बांदा | राकेश परब :
पाडलोस-केणीवाडा येथे भरवस्तीत बिबट्याने घुसून कुत्र्यावर हल्ला केला. अजित कोरगावकर यांना कुत्र्याची धडपड ऐकू आल्याने बाहेर येईपर्यंत बिबट्याने कुत्र्याच्या जीव घेतला. सदर घटना आज पहाटे घडल्याचे श्री. कोरगावकर यांनी सांगितले.

शेतकरी अजित कोरगावकर यांच्या घराशेजारील मांगरामध्ये कुत्रा होता. त्यावेळी बिबट्या येत असल्याचा सुगावाही कुत्र्याला लागला नाही. जीव वाचवण्यासाठी कुत्र्याची धडपड कोरगावकर यांच्या कानी पडताच त्यांनी धाव घेतली. परंतु तोपर्यंत बिबट्याने कुत्र्याला जखमी केले होते. बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून नेत होता परंतु श्री. कोरगावकर यांनी लाईट सुरू केल्याने बिबट्याने धूम ठोकल्याचे श्री. कोरगावकर यांनी सांगितले.

मडुरा पंचक्रोशीत बिबट्यांचा वावर वाढला असून, शेतकर्‍यांच्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले जात आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीवप्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या आहेत. याकडे वनविभागाने गांभीर्याने पाहून तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असे महेश कूबल यांनी म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स