श्री देव रवळनाथ, भवानी, ब्राह्मण प्रमुख पंचायतन देवस्थान, बांदा देवस्थानाचा वार्षिक उत्सवाचे आयोजन...!
बांदा | राकेश परब :
श्री देव रवळनाथ, भवानी, ब्राह्मण प्रमुख पंचायतन देवस्थान, बांदा महाजन, काणेकर, मुंगी या घराण्यांचे खाजगी देवस्थानाचा वार्षिक उत्सव २९,३०नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी होत आहे या निमित्ताने विविध धार्मिक
कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी २९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता देवी भवानी मांडाची पुजा, रात्रौ ११.०० वा दिवटीचा कार्यक्रम व देवी भवानीचा अवसारी कौल, रात्रौ ११.३० महाप्रसाद, पहाटे ६.०० वा दीवटी विसर्जन, बुधवारी दि ३० रोजी रात्रौ ८.००वा पंचायतनाचा अवसारी कौल, गुरुवारी १ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा श्रींचे नामस्मरण, सकाळी १०.३० पासून संपूर्ण वर्षात श्री देवीस भरलेल्या ओटीच्या साड्या-खणांची,
श्री भवानीच्या मांडावरील कलशावरील श्रीफळ व कलशातील सोन्याच्या ५ ग्रॅम नाण्यांची पावणी, दुपारी १.३० वा श्री पंचायतनांस महाप्रसाद, आरती व पंचायतनाचा अवसारी कौल, सायंकाळी ६.३० वा
प्रसाद पाकळी कौल या वार्षिक उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)