पाडलोस रवळनाथ देवस्थानाचा २९ नोव्हेंबरला जत्रोत्सव..!
बांदा | राकेश परब :
सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव मंगळवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.
भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी मिरवणूक होणार आहे. नंतर आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत २ नौकांचे सहकारी संस्थांना वितरण.
आगामी काळात स्वबळावर लढण्याचा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला मानस.
भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड..!