ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
रानमित्र आचरा आयोजित पर्यावरणविषयक स्पर्धा उत्साहात संपन्न…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रानमित्र आचरा आयोजित पर्यावरणविषयक स्पर्धा उत्साहात संपन्न…!

प्रकाशन: 28 Nov 2022 08:09 PM
वाचन संख्या 112

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवार २७ नोव्हेंबरला रानमित्र आचरातर्फे केंद्रशाळा आचरे नं.१ याठिकाणी पर्यावरणविषयक वकृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आले होते. तिन्ही स्पर्धांमध्ये मालवण व देवगड तालुक्यातील विविध स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेचा उद्देश देशाची भावी पिढी असणार्या शालेय मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार त्यांच्यामनी रुजावा हा होता.
या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा : लहान गटात किंजल परब ( भगवंतगड शाळा) -प्रथम, कृतिका लोहार ( कट्टा हायस्कूल)-व्दितीय, रेवती लाड ( श्रावण नं १)- तृतीय तर वक्तृत्व स्पर्धा- मोठ्या गटात करीना राणे ( मुणगे हायस्कूल)-प्रथम, ईशान गोडबोले ( देवगड काॅलेज)- व्दितीय, नियती पेडणेकर ( आचरा काॅलेज) -तृतीय, निबंध स्पर्धेमध्ये – लहान गट
स्वराली ताम्हणकर ( कट्टा हायस्कूल) प्रथम, लाजरी कांदळगावकर ( ओझर हायस्कूल)-व्दितीय, नुर्वी शेटगे ( आचरा नं १) तृतीय, निबंध स्पर्धेत- मोठा गट निधिश चौगुले ( पिरावाडी हायस्कूल)- प्रथम, रश्मी पांचाळ ( कट्टा हायस्कूल)-व्दितीय, वैभवी परब ( ओझर हायस्कूल)- तृतीय. चित्रकला स्पर्धेत रुद्राक्ष मेस्त्री ( कट्टा हायस्कूल)- प्रथम, वेदिका करवडकर (आचरा हायस्कूल)-व्दितीय, जीवन मेस्त्री ( हिर्लेवाडी शाळा) तृतीय,
उत्तेजनार्थ – प्रसन्ना घनःश्याम प्रभू ( आचरा पिरावाडी)

विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पर्यावरणविषयक पुस्तक व एक स्थानिक झाड देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सर्व स्पर्धकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणेश मर्गज
अध्यक्ष – शिल्पन गांवकर तर प्रमुख उपस्थिती केंद्रप्रमुख गुरव, मुख्याध्यापक जोशी, मुख्याध्यापक पेडणेकर, नितीन घाडी, बाबू परुळेकर, मंदार सांबारी, डॉ. सिद्धेश सकपाळ, निलेश सरजोशी, शंकर वस्त, रानमित्र सदस्य-शिल्पन गांवकर, डॉ मगदूम, स्वप्निल गोसावी, मंदार सरजोशी, सुशांत सावंत, विशाल गोलतकर, दिलीप गोसावी, चैतन्य आडवलकर, संतोष गोसावी, तेजस सामंत, सिद्धेश देवधर, डॉ सकपाळ, मंगेश गोसावी, किरण सावंत, श्रेयस सावंत, गोसावी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स