बांदिवडे पालयेवाडी येथील भाजप कार्यकर्ते शिवबंधनात.
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे पालयेवाडी येथील भाजपचे माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, पुष्पक घाडीगांवकर, नारायण परब यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून पक्षात स्वागत केले. यावेळी योगेश मेस्त्री, अभिजीत घाडीगांवकर , महेंद्र हिर्लेकर ,मनिषा हिर्लेकर,आबु घागरे, यशवंत परब,बाबाजी परब या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, शिवउद्योग आघाडी मालवण तालुकाप्रमुख मंगेश गावकर, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे,उपविभागप्रमुख अनिल गावकर, युवासेना उपतालुकाप्रमुख आशु मयेकर,संजय राणे,शाखा प्रमुख मधुकर परब, गुंडूपंत मिठबावकर, स्वप्नील मुणगेकर, निशांत मुणगेकर, बाबी राणे, घाडीगांवकर असे शिवसैनिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)