ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे यश..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे यश..!

प्रकाशन: 28 Nov 2022 07:46 PM
वाचन संख्या 115

१९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये अजिंक्य पद प्राप्त.

मालवण | प्रतिनिधी :  शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये १९ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये  मालवणच्या स.का. पाटील महाविद्यालयातील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण यांनी अंतिम सामन्यामध्ये बाजी मारीत अजिंक्यपद पटकावले असून महाविद्यालयाच्या संघाची जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धेसाठी  निवड झाली आहे. या सामन्यात सानिया अटक हिने अष्टपैलू खेळाडूची कामगिरी बजावली. तसेच अंतिम सामन्यामध्ये क्षितिजा खरवते हिने देखील तिला चांगली साथ दिली.

मालवण येथील बोर्डिंग ग्राउंड येथे घेण्यात आलेल्या शालेय कबड्डी स्पर्धेचा १९ वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय विरुद्ध टोपीवाला ज्युनिअर कॉलेज या संघामध्ये झाला. शेवटचा सामना पाहण्यासाठी क्रीडा रसिक शेवटपर्यंत जागेवर खिळून बसले होते. हा सामना अटीतटीचा झाला असून रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय संघाच्या मुलींनी यामध्ये बाजी मारली. अंतिम सामन्यामध्ये सानिया अटक हिने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन दाखविले तर क्षितिजा खरवते, अनुष्का म्हापणकर, पूजा मुणगेकर यांनी चढाईची धुरा सांभाळत उत्तम खेळ दाखविला. तर माधवी तेली, रेश्मा पांढरे, दर्शना भिसे यांनी मोक्‍याच्याक्षणी उत्कृष्ट पक्कड करीत अंतिम सामन्यात टोपीवाला ज्युनिअर कॉलेज या संघास धूळ चारली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.ए. ठाकूर यांनी गुलाबपुष्प देऊन संघाचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय या संघाला प्रा. हसन खान यांचे मार्गदर्शन लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स