जिल्हा रुग्णालयात ३४ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया..!
मसुरे | प्रतिनिधी :
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आयोजित जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे १० नोव्हेंबर १३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ० ते १८ वयोगटातील इतर प्रवर्गातील शस्त्रक्रिया (Tongue Tie, Phimosis, Hypospadias, Hydrocele, Undescended testis, Hernia, Appendix, Cyst, Other) शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबीरामध्ये Tongue Tie, Phimosis, Hypospadias, Hydrocele, Undescended testis, Hernia, Appendix, Cyst, व इतर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व सायन हॉस्पिटल मुंबई टिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे यशस्वीपणे पार पडल्या. यामध्ये ५२ लाभार्थी होते त्यापैकी 3४ लाभार्थ्यांवर शस्त्रक्रिया व उपचार व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे करण्यात आले. उर्वरित १० बालकांना उपचार व शस्त्रक्रियांसाठी सायन हॉस्पीटल मुंबई येथे संदर्भित करण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदशर्नाने सर्व लाभार्थ्यांना लागणारे औषधोपचार, शस्त्रक्रिया, संदर्भसेवा ,फेरतपासणी करण्यात आल्या या शिबिरासाठी , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शाम पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुबोध इंगळे, डॉ . अपर्णा गावकर, सायन हॉस्पिटल मुंबई चे बाल शल्यचिकित्सक डॉ पारस कोठारी आणि टीम, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री राजेश पारधी ,श्री विश्वनाथ राव, श्रीम एकता वराडकर तसेच R.B.S.K. अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)