ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी राज्यमार्ग दर्जोन्नत करण्याचा निर्णय..!

कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी राज्यमार्ग दर्जोन्नत करण्याचा निर्णय..!

प्रकाशन: 28 Nov 2022 12:05 PM
वाचन संख्या 47

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी- तारामुंबरी-देवगड हा ६ कि. मी. असलेला इजिमा क्र. २२ हा प्रमुख जिल्हा मार्ग विशेष बाब म्हणून दर्जोन्नत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत गुरुवारी शासन निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आ. नीतेश राणे यांनी दिली. त्यामुळे देवगडहून कुणकेश्वरला जाणारा मार्ग पर्यटक व स्थानिकांसाठी सुलभ होणार आहे.

कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी- तारामुंबरी – देवगड हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाल्याने पर्यटक व स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही या रस्त्यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. देवगड- कुणकेश्वर जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने

या मार्गावर सतत रहदारी असते. कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी-तारामुंबरी-देवगड राज्य मार्ग १७८ ला मिळणारा इजिमा क्र. २२ प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला होता.

या रस्त्यावरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्याचा होणारा वापर तसेच प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिलेली मान्यता विचारात घेण्यात आली आहे. देवगड येथील बाजारपेठ, हायस्कूल, कालेज, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय व देवगड येथील लोकांना मिठमुंबरी बीच, कुणकेश्वर मंदिर येथे जाण्याकरिता सोयीचे होणार आहे. तसेच देवगड ते कुणकेश्वर मंदिरमधील अंतर कमी होऊन इंधन व वेळेत बचत होणार आहे. म्हणून हा रस्ता होणे आवश्यक होते. त्यामुळे एक विशेष बाब म्हणून हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स