देवगड तालुकास्तरीय शालेय शासकीय कॅरम स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर साळशीच्या काजल घाडीगावकर चे घवघवीत यश..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड येथे पार पडलेल्या देवगड तालुका स्तरिय शालेय शासकीय कॅरम स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर साळशी च्या ५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १७ वर्षा खालील मुली या गटात कुमारी काजल कुलदीपक घाडीगावकर इ.१० वी ,हिने विजेते पद पटकावले असून तिची जिल्हा स्तरिय कॅरम स्पर्धे साठी निवड झाली आहे.
या सर्व सहभागी विद्यार्थ्याचे ,यशस्वी स्पर्धक काजल घाडीगावकर व मार्गदर्शन करणाऱ्या पुरुषोत्तम साटम यांचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, चेअरमन-सत्यवान सावंत , सर्व संस्था सदस्य व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)