ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या उद्यापासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया…

कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या उद्यापासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया…

प्रकाशन: 27 Nov 2022 06:52 PM
वाचन संख्या 40

कणकवली | प्रतिनिधी : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उद्या दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २ जणू०२२ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्व प्रक्रिया तहसिलदार कार्यालयात होणार असून तेथे ३८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसहीत कर्मचान्यांचा ताफा तैनात असणार आहे. यासाठी माहितीफलकासहीत पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. तहसिलदार आर. जे. पवार हे स्वतः उपस्थित राहून या साऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.

तालुक्यातील ६३ पैकी ५८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका १८ डिसेंबर रोजी होणार आहेत. यासाठी सोमवार २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही होणार आहे. ही सर्व प्रक्रिया तहसिलदार कार्यालयात होणार आहे. यासाठी ३८ निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकेका निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे छोट्या दोन व मोठ्या एकच ग्रामपंचायती देत नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांना सहाय्यकही देण्यात आले आहेत. तसेच हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करता पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये कंपार्टमेंट तयार करत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवार व कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी कोणत्या नंबरच्या कंपार्टमेंटमध्ये कोणती ग्रामपंचायत आहे, याबाबतचे माहितीफलक गेटवर तसेच तहसीलदार कार्यालयात लावण्यात आलेले आहेत. जेणेकरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना कोणतीही समस्या जाणवू नये याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच दाखल अर्ज फिडींग करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात संगणक कक्षही सज्ज करण्यात आला आहे. तहसीलदार आर. जे. पवार, नायब तहसिलदार शिवाजी राठोड व सर्व टीम यासाठी कार्यरत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स