पळसंबच्या जयंती देवी देवस्थानाला पाण्याची टाकी भेट.
डोंबिवलीच्या ‘विमेन्स वेलफेअर सोसायटी नया सवेरा’ संस्थेचे दातृत्व.
विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील जयंती देवी मंदिर देवस्थान येथे डोंबिवली वुमेन्स वेल्फेअर सोसायटी नया सवेरा यांच्या सौजन्याने देण्यात आलेल्या स्टॅन्ड सहित पाण्याच्या टाकीच लोकार्पण पळसंब जेष्ठ नागरिक दादा गांवकर याच्या हस्ते आज करण्यात आले.
त्यावेळी देवस्थान मानकरी राजन पुजारे, देवस्थान कमिटी सचिव चंद्रकांत गोलतकर, जयंती सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत,अमरेश पुजारे, शेखर पुजारे, अमित पुजारे, प्रमोद सावंत, पांडुरंग सावंत उपस्थित होते.
यावेळी ‘डोंबिवली वुमेन्स वेल्फेअर सोसायटी नया सवेराच्या’ डॉ .सौ .स्वाती गाडगीळ डोबिवली यांचे देवस्थानच्या वतीने प्रकाश कापडी व रमेश परब यांनी आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)