मच्छीमार समाज बांधवांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे..
मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या समस्यां बाबत केली चर्चा..
मालवण | प्रतिनिधी :
भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीवर होते.भेटी दरम्यान काल २६ नोव्हेंबरला त्यांनी सावंतवाडी येथे विविध ओबीसी समाज बांधव प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. सदर संवादा दरम्यान मच्छीमार समाजाचे नेते श्री.वसंत तांडेल, श्री. रविकिरण तोरसकर,श्री.भूषण सारंग यांनी मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या समस्या बाबत चर्चा केली.यामध्ये प्रामुख्याने परप्रांतीय हाय स्पीड ट्रॉलर चे अतिक्रमण, मासेमारी कायद्याची अंमलबजावणी,गाबित समाज बांधवांना जातीचे दाखले मिळण्याकरिता येणाऱ्या अडचणी व इतर विषयाकडे लक्ष वेधले.आपण सदर विषयात राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
शासन दरबारी मत्स्य उत्पादन वाढी साठी योग्य पाठपुरावा करावा जेणेकरुन मच्छीमारांच्या टोपलीत मासे सदैव भरलेले राहतील .असे साकडे ,भेटवस्तू म्हणून ‘लाकडी मासा व वेताची टोपली’ देऊन श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांना घालण्यात आले.यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. निशांत तोरसकर,श्री.बाळू देसाई,श्री.विकी केरकर ,जिल्हा बँक उपाध्यक्ष श्री.अतुल काळसेकर, सावंतवाडी मा. नगराध्यक्ष श्री.संजू परब जिल्हाध्यक्ष श्री.राजन तेली व इतर मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)