तारकर्ली येथे होमस्टे,हॉटेल व्यावसायिकांसाठी झटपट पंजाबी,हैद्राबादी,कोल्हापुरी,मालवणी डिश बनविण्याचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर यांनी दिली माहिती.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : पर्यटन व्यावसायिक महासंघ व मातृत्व वरदान फाऊंडेशनच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्यातील होम स्टे, कृषी पर्यटन प्रकल्प हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या आदरातीथ्य करत असताना मालवणी जेवणाच्या आस्वादा सोबत पंजाबी, हैद्राबादी, कोल्हापुरी जेवणाच्या आस्वाद देता यावा यासाठी व्यावसायिकांसाठी दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ५ वेळेत रॉयल ओशन बीच रिसॉर्ट तारकर्ली येथे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलें असून तयार ग्रेव्हीच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत डिश बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शेफ के .प्रसन्ना उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व मे .वैष्णवी न्यूट्री फूड प्रा.लि स्वीकारले असून सदर कार्यक्रमासासाठी जास्तीत जास्त पर्यटन व्यवसायिकांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा तसेच ज्यांना यांसाठी नाव नोंदणी करायची असेल त्यांनी ८२७५६६३९९९ या नंबर ला फोन करून नाव नोंदणी करू शकता असे आवाहन मातृत्व वरदान फाऊंडेशन, पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे श्री. विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)