ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आता गळती नाही..! ( विशेष)

आता गळती नाही..! ( विशेष)

प्रकाशन: 26 Nov 2022 01:54 PM
वाचन संख्या 73

लोकसहभागातून उभे राहिले लिकप्रूफ “‘सावरकोंड’ जलमंदिर; पर्यटन वाढीसाठीसुद्धा होणार मदत.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटळ गावातील सावरकोंड येथे संजय यादवराव यांच्या “कोकणभूमी” यांच्या सीएसआर फंड आणि नाटळ ग्रामस्थ लोकसहभाग यातून बांधत असलेले “सावरकोंड जलमंदिर” (बंधारा) मे २०२२ मध्ये पूर्ण झाले. पावसाळ्या नंतर तब्बल २कोटी, २५ लाख, ६० हजार लिटर पाणी साठा आजच्या दिवशी झाला असल्याचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत यांनी सांगितले. यासाठी निधी कोकण भूमीचे राज्याचे माजी सचिव द. म. सुखटणकर यांनी दिला होता. संजय यादवराव यांनी हा फंड देताना लोकसहभागाची गरज सांगितली होती. त्याप्रमाणे नाटळमधील काही दाते, जागृत ग्रामस्थांनी यातील लोकसहभागसाठी आवश्यक असणारा फंड उभा करून दिला. नीट नियोजन केल्याने केवळ रु. १८ लाखात हे जलमंदिर उभे राहू शकले असल्याची माहिती अध्यक्ष विश्वनाथ सावंत यांनी दिली आहे.


गेल्या वर्षी कोरोना काळात जलयोद्धा मा. राहुल तिवरेकर यांच्या “दिगंत फाउंडेशन”ची टीम सरकारी नियमांमुळे येऊ न शकल्याने स्थानिक कामगारांना घेऊन हा बंधारा पूर्ण करण्यासाठी ग्राम विकास मंडळाने काम सुरु केलं. परंतु १५ मे २०२१ ला आलेल्या तोक्ते वादळामुळे नदीची साखळी सुटल्याने पाणी सलग वाहू लागले आणि फक्त बेस घालून काम थांबावं लागलं. “सावरकोंड जलमंदिर” बांधताना पायाच्या खडकास ड्रीलिंग केले त्यामुळे ग्रामविकासने केलेले हे काम लिकप्रूफ झाले.

३ मे २०२२ ला दिगंत फाऊंडेशनची २८ कामगारांची किरकोळ शरीरयष्टीची टीम आली.
उपाध्यक्ष भालचंद्र सावंत (दादा) टीम आल्यापासून सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन होते. सोबत खांदारवाडीचे श्री. अविनाश सावंत हे मदतीस होते. प्रशासकीय काम सेक्रेटरी समीर सावंत (कुणकेरकार) यांनी पार पाडले. हे काम करीत असताना एका काठावरील अभिजित (दादा) आणि अरविंद (गोट्या) ह्या बंधूंची मोलाची मदत झाली. याव्यतिरिक्त अनेक लोकांचे हे जलमंदिर उभे करताना स्थानिक पातळीवर हात लागले असे सावंत यांनी सांगितले.हर्षद घोलकर , हुमलेटेम्बावरील कु. गौरव सावंत या इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या तरुणाची मदत झाली.

तब्बल २ कोटी, २५लाख, ६० हजार लिटर पाणी साठणाऱ्या या सावरकोंड जलमंदिराची बंधाऱ्याची लांबी ११०फूट, बॅकवॉटर लांबी ७०० फूट, बांधकामाजवळ खोली १० फूट असून या बंधाऱ्यास केवळ १८ लाख खर्च आलेला आहे. ह्या खर्चापैकी २५% खर्च नाटळ ग्रामविकास संस्थेने लोकसहभागातून तर उरलेला ७५% संजय यादवराव यांच्या “कोकण भूमी” यांनी केला आहे. हा पूर्ण लिकप्रूफ बंधारा राहुल तिवरेकर यांच्या “दिगंत स्वराज्य फाउंडेशन” यांनी ड्रीलिंग करून पूर्ण केला. नाटळ गावात आतापर्यंत बांधलेले बंधारे बांधताना पाया खोदताना सुरुंग लावून स्फोट केले गेल्याने सर्व बंधारे लिक आहेत. पण हा सावरकोंड जलमंदिर बंधारा ड्रिल केल्याने लिकप्रूफ आहे. सरकारी यंत्रणेने याकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावे अशी मागणी विश्वनाथ सावंत यांनी केली आहे.
बंधाऱ्याची एरो डायनॅमिक दरवाजे आणि व्हेन्ट बंद केल्या नंतर केवळ १४तासातच २ कोटी, २५ लाख, ६० हजार लिटर पाणीसाठा थांबला गेला.

हे मानवनिर्मित बांधकाम पर्यटनदृष्ट्या देखील महत्त्वाचे ठरणार. याच्या विंग (बंधाऱ्यास धरून ठेवणारे दोन्ही तीरावरील बांधकाम) हे एका बाजूस १५ लोक वावरू शकतील एवढे मोठे आहे. दोन्ही बाजूस पायऱ्या केलेल्या आहेत. पाणी वाढल्यानंतर या पायऱ्यांवरून धावणारं पावसाळ्यातले पाणी विलोभनीय होते.
ह्या सावरकोंड जलमंदिराची लांबी ३५ मीटर असून वरील भागातील चालण्यासाठी रुंदी ४.५ फूट रुंद आहे, तो ७ फूट रुंद आहे. ऑक्टोबरमध्ये याचे दरवाजे लागल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत पाणी वाहत असल्याने या जलमंदिरातील पाण्याचा वापर जूनपर्यंत करता येईल.
या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना मे महिन्यात देखील पाणी राहील. भूगर्भातील झरे प्रवाहित होण्याची प्रक्रिया हळूहळू जरी होत असेल तरी नजीकच्या विहिरींना याचा प्रत्यय लक्षणीयरीत्या २०२३च्या मे महिन्यात जाणवेल. सावरकोंड जलमंदिरातील पाणी भविष्यात आजूबाजूच्या वाड्यांतील भगीरथांनी एकत्र येऊन आपल्या वाडीकडे घेऊन नेण्याकरिता योजना बनविणे आवश्यक आहे. नाम फाउंडेशन ची मदत एखाद्या गावाला हवी असल्यास मदत केली जाईल अशी माहिती ग्रामविकास मंडळ अध्यक्ष विश्वनाथ सावंत यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स