भाजपच्या घोटगे ग्रामपंचायत सदस्या भाविका धुरी यांचा शिवसेनेत प्रवेश.
आमदार वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत भाविका धुरी यांच्यासह टेंबवाडीतील अनेकजण शिवबंधनात.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोटगे टेंबवाडी येथील भाजपच्या ग्रामपंचायत सदस्या भाविका धुरी यांच्यासह टेंबवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे झालेल्या या प्रवेशावेळी आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
यामध्ये घोटगे टेंबवाडी येथील भास्कर धुरी, रमाकांत गवाणकर, भालचंद्र नेरुरकर, सुहास नेरुरकर, सुप्रिया नेरुरकर, रुचिता गवाणकर आदींनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
यावेळी घोटगे शाखा प्रमुख चंदन ढवळ, घोटगे उपसरपंच गीतेश सावंत, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे,अवि नाईक, मुंबई शाखा प्रमुख अशोक नेरुरकर, शिंदे मिलिंद आईर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)