हडी येथील राजेश शेडगे शिवबंधनात..!
आमदार वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन
मालवणचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली केला पक्षप्रवेश.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या हडी येथील राजेश उर्फ (बंबू) शेडगे यांच्यासह भावेश सुर्वे, रवींद्र सुर्वे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
राजेश शेडगे हे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जात होते.
कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. मालवणचे माजी नगरसेवक मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेण्यात आला
आमदार वैभव नाईक यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन त्याचबरोबर हडी गावाचा विकास शिवसेनेच्या माध्यमातून होत असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे राजेश उर्फ (बंबू) शेडगे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख राजेश गांवकर, हडी गावचे माजी उपसरपंच , शाखा प्रमुख संतोष अमरे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर चिंदरकर, दशरथ गांवकर, नंदकुमार गांवकर, नागेश कावले, सिद्धेश मांजरेकर, हरी आसोलकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)