ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रेडी येथे उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार, कलशरोहण कार्यक्रमांचे आयोजन..!

रेडी येथे उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार, कलशरोहण कार्यक्रमांचे आयोजन..!

प्रकाशन: 26 Nov 2022 11:16 AM
वाचन संख्या 64

बांदा | राकेश परब :
रेडी-तिवरेवाडी येथे उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार, कलशरोहण तसेच श्री दत्त महाराजांच्या पार्थिव मूर्तीची व पादुकांची प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक २ ते ४ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.

शुक्रवारी दिनांक २ रोजी सकाळी यजमान शरीरशुद्धी, देवता प्रार्थना, गणपती पूजन, पुण्यहवचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्य पूजन, प्रकार शुद्धी, देवता जलाधीवास, शनिवार दिनांक ३ रोजी सकाळी शांतीपाठ, प्राकार शुद्धी, देवता आवाहन, वास्तूयजन, रविवार दिनांक ४ रोजी सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी शिखरकलश स्थापना, १२ वाजून ३५ मिनिटे या मुहूर्तावर श्री दत्तमहाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, त्यानंतर महाप्रसाद व सायंकाळी विविध मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार दिनांक ७ रोजी सकाळी दत्त जयंती निमित्त पादुका अभिषेक, महाआरती व महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव दत्त मंदिर ट्रस्ट व श्री देव दत्त मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स