ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

प्रकाशन: 26 Nov 2022 10:55 AM
वाचन संख्या 75

बांदा | राकेश परब :
बांदा येथील श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी देवदीपावलीला हा कार्यक्रम केला जातो. शेकडो भाविकांनी पेटविलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर लख्ख उजळून गेला होता.

सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त अभियंता सुधीर देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये, उपाध्यक्ष बाळू सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, धोंडू पणशीकर, उमेश मोर्ये, गजानन मोर्ये, राजा सावंत, दादा सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, प्रवीण सावंत, संतोष तारी, सुगंधा मोर्ये, अरुणा मोर्ये, उमांगी मयेकर, अवंती पंडित आदिसह देवस्थानचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

या दीपोत्सवासाठी प्रत्येक दिव्यासाठी अकरा रुपये अर्पणमुल्य ठेवण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने दिप प्रज्वलीत केले.

श्री बांदेश्वर भक्त महिला सेवेकरी मंडळींनी दिवे भरुन देण्याचे काम केले तसेच मंदिरासमोर सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. श्री बांदेश्वर भुमिका मंदिराचा परिसर दिव्यांच्या तेजाने उजऴून गेला होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स