ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तरंदळे रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

तरंदळे रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

प्रकाशन: 25 Nov 2022 06:41 PM
वाचन संख्या 58

खोतवाडी येथे आयोजीत झाले रक्तदान शिबीर.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरंदळे खोतवाडीतील श्री वशिक मर्यादा जागृत देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष बाब म्हणजे २ दुर्मिळ रक्तदात्यांनी व २ महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मंदिर ट्रस्टने या पद्धतीचा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल गौरवोद्गार काढले तसेच भविष्यातही या प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सावंत, ट्रस्ट अध्यक्ष संतोष गंगाराम सावंत, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील प्रमुख डॉ. तपसे, तरंदळे उपसरपंच संदेश सावंत, आरोग्य अधिकारी डाॅ.विद्या रासम,परिचारिका सौ.माईणकर व जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. पद्मश्री हळदणकर यांसह ट्रस्ट विश्वस्थ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प तसेच मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स