ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सोनवडे तर्फ कळसुली मुस्लिमवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सोनवडे तर्फ कळसुली मुस्लिमवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

प्रकाशन: 24 Nov 2022 05:41 PM
वाचन संख्या 71

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला प्रवेश.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनवडे तर्फ कळसुली मुस्लिमवाडी येथील भाजपा कार्यकर्ते शब्बीर खान, जमील खान, अजीम खान, इजास खान यांसह सुमारे ४० ते ५० कार्यकर्त्यानी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून आ. वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना पक्षवाढीसाठी मेहनत घेणार असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी उपसभापती जयभारत पालव, नगरसेवक उदय मांजरेकर, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ, शेखर गवंडे, बाळू पालव, गुरु सडवेलकर,सोनवडे शाखा प्रमुख गुरू मेस्त्री, सोनवडे सोसायटी चेअरमन काशीराम घाडीगांवकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडी, दीपक गंगाराम घाडी आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स