ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे महिला जिल्हाप्रमुखपदी वर्षा कुडाळकर .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे महिला जिल्हाप्रमुखपदी वर्षा कुडाळकर .

प्रकाशन: 24 Nov 2022 04:52 PM
वाचन संख्या 143

बबन शिंदे यांच्याकडे मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्रप्रमुखाची जबाबदारी.

Article image
श्री. बबन शिंदे

विश्वास गांवकर यांच्याकडे मालवण शहर व देवबाग,कट्टा,पेंडूरचे तालुका प्रमुख पद.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार आग्रे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. तर महिला जिल्हाप्रमुख पदी कुडाळ येथील वर्षा कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाप्रमुखपदी महिंद्र सावंत, शेखर राणे, विश्राम रावराणे यांना नियुक्ती दिली असून, सावंतवाडी भागाच्या जिल्हाप्रमुखांची निवड लवकरच करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुंबई येथील सह्याद्री बंगल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रत्न सिंधू योजना सदस्य किरण सामंत, माजी खा. सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

या निमित्ताने कणकवली येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नूतन जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जि. प. सदस्य संदेश पटेल, नूतन तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भास्कर राणे, सुनील पारकर, शेखर राणे आदी उपस्थित होते.

संजय आग्रे यांच्याकडे कणकवली देवगड वैभववाडी कुडाळ मालवण या 5 तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख (कणकवली, देवगड, वैभववाडी) संदेश पांडुरंग सावंत (पटेल), उपजिल्हाप्रमुख महिंद्रा सावंत, शेखर राणे, विश्राम रावराणे यांची नावे जाहीर करण्यात आली.

तालुका प्रमुख :- कुडाळ -योगेश उर्फ बंटी तुळसकर, कणकवली- (जानवली. फोंडा, हरकुळ, कलमठ, कळसुली, नाटळ, कणकवली शहर) भुषण परुळेकर, (कासार्डे, खारेपाटण) शरद वायंगणकर. देवगड :- (शिरगाव, फणसगांव पोंभूर्ले किंजवडे, देवगड शहर)- विलास साळसकर,

(मिठबाव, पडेल. पुरळ, जामसांडे शहर)- अमोल लोके मालवण :- (आचरा, आठवली, मसुरे, सुकळवाड)- महेश राणे, (देवबाग, कट्टा, पेंडुर, मालवण शहर)- विश्वास गावकर, वैभववाडी : संभाजी रावराणे, कणकवली तालुका समन्वयक सुनिल पारकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स