सावंतवाडीतील सर्पमित्राची कर्तव्यदक्षता..!
एकाच दिवशी तीन सापांना जीवदान…!
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी येथील सर्पमित्र श्री. नवीद हेरेकर यांनी एका दिवसात घोणस जातीच्या २ व धामण जातीचा १ अशा एकूण तीन सापांना मानवी वस्तीतून पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. पहिले घोणस हे माजगाव ग्रामपंचायत येथे समोरच्या घरामध्ये सकाळी १२.०० वाजता पकडला, दुसरी धामण गरड भागातील प्रवीण ठाकुर यांच्या दुकानात दुपारी १.०० वाजता व तिसरा घोणस हा सावंतवाडी येथील पोलीस वसाहत येथे दुपारी ३.००वाजण्याच्या सुमारास पकडला.
हे तिन्ही सर्प श्री. हेरेकर यांनी लगेचच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. आपण जोपासलेल्या छंदा प्रति श्री. हेरेकर यांनी दाखवलेली तत्परतेसाठी लोकांनी त्यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)