ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या जिल्ह्यात सदिच्छा भेटी .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या जिल्ह्यात सदिच्छा भेटी .

प्रकाशन: 24 Nov 2022 03:35 PM
वाचन संख्या 42

अनेक ठिकाणी झाले जोरदार स्वागत.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सावंतवाडी येथे विधान परिषद शिक्षक मतदार संघाचे कोकण विभागाचे  उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा जिल्ह्यात सदिच्छा भेट दौरा सलग दुसर्‍या दिवशी उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू उमेदवार म्हणून म्हात्रे यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा’ या उक्ती प्रमाणे सर्वच शिक्षक बांधवांनी यावेळी उत्साह दर्शवला. दरम्यान दिवसभर कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार पहायला मिळाला. प्रत्येक शाळेतील उपस्थित शिक्षकांनी म्हात्रे यांचे जोरदार स्वागत केले. म्हात्रे यांनी प्रत्येक ठिकाणी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

शिक्षण क्षेत्रातील  प्रश्न आणि भेडसावणाऱ्या समस्यांची जाण त्याच क्षेत्रातल्या व्यक्तीला माहीत असतात.  सदर प्रश्न आणि समस्या तो आपले म्हणुनच सोडवतो कारण त्या व्यक्तीने जवळून पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या असतात. म्हात्रे यांनी हजारो शिक्षकांचे प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन सोडविले आहेत. प्रसंगी 250 पेक्षा जास्त आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आणि अधिकारांसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे विधान परिषदेत पोहचणे गरजेचे आहे जेणेकरून आपला हक्काचा माणूस आपल्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच हजर राहील व अनेक प्रश्न विधान परिषदेत मांडेल. शेवटी उपस्थित शिक्षकांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिक्षक आमदार म्हणून निवडून देण्याचा निर्धार केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स