ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
धनगर समाज व इतर जाती जमातीतील जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरीत मिळावीत - प्रवीण काकडे.               
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

धनगर समाज व इतर जाती जमातीतील जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरीत मिळावीत - प्रवीण काकडे.               

प्रकाशन: 24 Nov 2022 03:02 PM
वाचन संख्या 34

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
धनगर समाज व इतर जाती जमातीतील मागासवर्गीयांची जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरीत मिळावीत अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. याबाबत लेखी निवेदन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सबंधीत अधिकार्यांना देण्यात येणार आहे.

एकेकाळी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवणेसाठी विभागीय कार्यालयाकडे जावे लागत होते. परंतु ही गैरसोय दूर करणेसाठी महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय उघडली परंतु जिल्हास्तरीय कार्यालयाकडून एखाद्या विद्यार्थ्यांस व्यक्तीस नोकरदार किंवा ज्यांना आवश्यक आहे अशांना सहजासहजी ”जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही.

राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यानी ३६  जिल्ह्यातील सामाजिक विभागाचा आढावा नुकताच घेतला होता. ज्या जिल्ह्याच्या जातपडताळणी समिती कार्यालयात तक्रारी आहेत. अशांची चौकशी करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त दिनेश डोके यांचे अध्यक्षतेखाली १० जणांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीत तज्ञ अधिकारी यांच्या नेमणूका करणेत आलेल्या आहेत. ही समिती राज्यभर फिरून जिल्ह्यातील समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.

या समितीच्यावतीने सबंधित जात पडताळणी समितीकडून देण्यात आलेली जात पडताळणी प्रमाणपत्रे बोगस-प्रलंबित प्रकरणाची कारणे, दक्षता पथकाचा कारभार, शैक्षणिक प्रमाणपत्रे प्रलंबित तक्रार अर्जाची कारणे याचा आढावा घेण्यात येणार आहे. आतापर्यंत समाजकल्याण कार्यालयाचा कारभार हा मनमानी स्वरूपात केला जात असून विनाकारण सर्वाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबधीत अधिकारी यांनी प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मागणी प्रवीण काकडे यांनी केली असून लवकरच महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील आधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स