ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना..!

देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना..!

प्रकाशन: 24 Nov 2022 02:50 PM
वाचन संख्या 345

कातवणच्या दिनेश शिंदे , प्रशांत शिंदे बंधूनी पाठवली पहिली पेटी.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश दीपक शिंदे व प्रशांत सिताराम शिंदे या दोन युवा आंबा बागायत दारांनी आपल्या बागेतील हापूसचे पीक चांगल्या पद्धतीने घेऊन देव दिवाळी व मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून आंबा काढण्याचा शुभारंभ करत पहिली दोन डझन ची पेटी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधराव्यातच मुंबई वाशी मार्केट येथील सुप्रसिद्ध व्यापारी अशोक हांडे यांच्या पेढीवर आज पाठविण्यात आली सकाळी आठ वाजता आंबे काढून या पेटीच्या शुभारंभ करण्यात आला .

कातवण येतील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे व दिनेश शिंदे यांच्या गोरक्ष गणपती मंदिर या ठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना 15 ऑगस्ट पासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र काही कलमावरील आलेला मोहर गळून पडला मात्र चार ते पाच कलमावरील मोहरा तसाच टिकून राहिला आणि तो टिकवण्यासाठी या शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच या चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभ मुहूर्त केला .त्यानंतर त्यापेटीची विधिवत पूजा करून ही पेटी वाशी येथे जाण्यासाठी रवाना झाली स्वतः आंबा बागायतदार शिंदे हे ही आंबापेटी घेऊन वाशी मार्केटला रवाना झाले आहेत. या दोन डझनच्या आंबा पेटीला साधारणतः सात ते आठ हजारच्या आसपास भाव मिळेल असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. मात्र यावर्षी आंबा सिझन पाहता अजूनही हापूसच्या कलमांना पालवीच येत आहे मात्र अशावेळी हापूसच्या कलमांची योग्य निगा राखत पहिली पेटी या दोन युवा आंबाबागायदारांनी पाठविली आहे. ऋतुचक्रात होत असलेले वारंवार बदल असून देखील या दोन बंधूनी मोहोर टिकविण्यासाठी व त्यावर आलेली आंबा पिकाची चव देखील स्वतः चाखून पहिली आणि त्यांनंतरच उर्वरित आंबे काढत ही पेटी आज मार्गस्थ केली आहे.

ऋतुचक्रातील बदल असून देखील योग्य पद्धतीने आंबा पिकून त्याची स्वतः चव चाखून आपण पिकविलेल्या मालाचा दर्जा चांगला आहे की नाही हे शेतकऱ्यांनी पाहणे खूप गरजेचे असते आणि हे शेतकऱ्यांनी स्वतः पाहिल्यानेच आमदार नितेश राणे यांनी देखील या दोन्ही शिंदे युवा बंधूंचे कौतुक केले आहे.

यावेळी आंबा बागायतदार दीपकचंद्र शिंदे, दिनेश शिंदे, प्रशांत शिंदे ,नरेश डामरी, लाड आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स