मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा चुरशीने संपन्न..!
न्यू इंग्लिश स्कूल आचराचा विद्यार्थी व चिंदरचा रहिवासी कु. कुंदन नाटेकर १४ वर्षांखालील मुलांमध्ये दुसरा.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या सिध्दिविनायक सभागृहात मालवण तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत १४ वर्षां खालील गटात ‘न्यू इंग्लिश स्कूल आचराचा’ विद्यार्थी व चिंदर गांवचा रहिवासी कु. कुंदन धनंजय नाटेकर याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशा बद्दल कु. कुंदन याचे चिंदर पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.
स्पर्धेचे उद्घाटन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक यांनी दीप प्रज्वलनाने केले. व्यासपीठावर सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष व तालुका क्रीडा समन्वयक अजय शिंदे, जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे अध्यक्ष सुयोग धामापूरकर, सचिव व राष्ट्रीय पंच श्रीकृष्ण आडेलकर, पंच रुपेश खोबरेकर, पंच उदय मालवणकर, वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक, इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषी नाईक तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय पेंडुरकर, रामकृष्ण सावंत, किसन हडलगेकर, दीपक जाधव, कमलेश गोसावी, महेंद्र वारंग तसेच तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेत तालुक्यातील १३ विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली.
या विद्यार्थ्यांना अजय शिंदे, सुनील नाईक, सुयोग धामापूरकर, संजय नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)