ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
१२ वी नंतर डिग्रीसाठी लागणार आता ४ वर्षे .

१२ वी नंतर डिग्रीसाठी लागणार आता ४ वर्षे .

प्रकाशन: 23 Nov 2022 01:06 PM
वाचन संख्या 48

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून १२ वी नंतरच्या डिग्रीसाठी म्हणजेच ग्रॅज्युएशनसाठी (Decision of UGC) बीए, बीकॉम आणि बीएससीसाठी जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना डिग्री मिळविण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. याबाबतचा महत्वाचा निर्णय विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (युजीसी) घेतला आहे. पुढील आठवड्यापासून याबाबतची माहिती सर्व विद्यापीठांना पाठविली जाणार आहे. यामध्ये ४५ केंद्रीय विद्यापीठांचा देखील समावेश आहे. ही माहिती युजीसीच्या अध्यक्षांनी दिली.
:युजीसीने (Decision of UGC) यासाठी चार वर्षांचे ग्रॅज्युएशन प्रोग्रामचे फ्रेमवर्क निश्चित केले आहे. केंद्रीय विश्वविद्यालयासह राज्य स्तरावरील आणि खासगी विश्वविद्यालयेदेखील चार वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स लागू करणार आहेत. देशीतील अनेक डीम्ड टू बी विद्यापीठे देखील हा अभ्यासक्रम स्वीकारण्यास तयार झाली आहेत.
विद्यार्थ्यांकडे तीन वर्षांत डिग्री मिळविण्याचा पर्यायही खुला असणार आहे. हा पर्याय या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांच्यासाठी असणार आहे. तसेच हे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी देखील अपग्रेड करू शकतात. तसेच जे विद्यार्थी आता पहिल्या, दुसऱ्या वर्षाला आहेत, ते देखील FYUGP चा पर्याय निवडू शकतात.
चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठे त्यांच्या स्तरावर काही नियमही बनवू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन प्रोग्राम पूर्ण केला आहे, त्यांना पीजी किंवा एमफिलसाठी प्रवेश घ्यायचा असल्यास ५५ टक्के गुण असणे गरजेचे असणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स