ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कै.सत्यविजय भिसे असते तर आज राजकारणाची एक वेगळी दिशा असती : आम.वैभव नाईक.

कै.सत्यविजय भिसे असते तर आज राजकारणाची एक वेगळी दिशा असती : आम.वैभव नाईक.

प्रकाशन: 22 Nov 2022 01:34 PM
वाचन संख्या 77

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २० वा स्मृतिदिन साजरा.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व कै. सत्यविजय भिसे यांनी समाजकार्यातून एक वेगळा ठसा उमटवला होता. नेहमीच ते सर्वसामान्य माणसांच्या मदतीला जात असत. त्यांनी युवा वर्गाचे संघटन उभारले होते. त्यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घेणे गरजेचे आहे. गेली २० वर्षे कै.सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा करून रक्तदान शिबीर त्यांच्या मित्रमंडळाकडून घेण्यात येते हे कौतुकास्पद आहे.
आज सत्यविजय भिसे असते तर इथले राजकारण वेगळे असते व त्याची एक वेगळी दिशा असती अशा शब्दात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कै. सत्यविजय भिसे यांना श्रद्धांजली वाहिली.

कै. सत्यविजय भिसे यांचा २० वा स्मृतिदिन आज कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने शिवडाव राउतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा भिसे,अरविंद दळवी, तेली सर, चंदू परब, मधु चव्हाण, सरपंच सौ. जाधव, लवू पवार, नितीन गावकर, बंडू लाड, संतोष मसुरकर, बाबू सावंत, सत्यविजय जाधव, नितीन हरमलकर, सुनील हरमलकर, निकेतन भिसे, कै. सत्यविजय भिसे प्रेमी व मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स