वेलकम बॅक होम चिंदरवासीय…!
चिंदर गांव भरण्यास सुरूवात….!
श्री. रवळनाथ देवाने दिला गाव भरण्यासाठी होकाराचा कौल .
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गांवातील ‘गांवपळण’ गेले तीन दिवस तीन रात्र चालू आहे.
आज दुपारी १:३० वाजता बारा पाच मानकरी ग्रामस्थ जमून श्री. देव रवळनाथ मंदिर येथे पाषाणाला कौल लावण्यात आले. देवाने गाव भरण्यास होकाराचा कौल दिल्यांने लोकांची गुरा ढोरांन सह गावात जाण्यास सुरवात होईल.
खरे तर कालच गाव भरण्याची अपेक्षा होती पण देवाचा कौल न मिळाल्यामुळे एक दिवस वाढला होता. आज कौल झाल्यानंतर लोकांनमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाल आहे.
शास्त्रीय व आरोग्यविषयक धार्मिक परंपरा असलेल्या गांवपळण नंतर आता चिंदर गांववासीयांना गांव जणू पुन्हा सांगतोय ‘वेल कम बॅक होम..चिंदरवासीय!’
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)