ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त "जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२" चे आयोजन.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त "जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२" चे आयोजन.

प्रकाशन: 22 Nov 2022 01:17 PM
वाचन संख्या 85

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२” चे आयोजन करण्यात आले आहे.
अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याची जाणीव व्हावी, ग्राहक चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी आणि शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी २४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२ चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर निबंध स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन गट, महाविद्यालय गट व खुला गट अशा तीन गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे-
१)पहिला गट- कनिष्ठ महाविद्यालयीन गट (इयत्ता ११ वी व १२ वी)
विषय- जागो ग्राहक जागो.
शब्दमर्यादा २०० ते ३००

२)दुसरा गट- महाविद्यालय गट
विषय- आभासी (ऑनलाईन) बाजारपेठ आणि ग्राहक.
शब्दमर्यादा- ३०० ते ४००.

३)तिसरा गट- खुला गट
विषय- अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू – ग्राहक.
शब्दमर्यादा- ४०० ते ५००.

स्पर्धकांनी आपला निबंध स्वच्छ अक्षरात पानाच्या एका बाजूला लिहिलेला असावा. स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, वर्ग, कनिष्ठ/महाविद्यालयाचा पूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक स्वतंत्र पानावर लिहावा.निबंध दिनांक १५ डिसेंबर पर्यंत संस्थेच्या पत्त्यावर पाठवावेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख रु.५०१/-, ३०१/- व २०१/- व प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय ग्राहक दिनी गौरविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले निबंध ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस. एन.पाटील मु. पो. ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग 416 810 या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रा.एस.एन.पाटील (9834984411), उपाध्यक्ष एकनाथ गावडे (9689077595), संघटक सिताराम उर्फ दादा कुडतरकर (9422239090) व सचिव संदेश तुळसणकर (9420100946) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स