'दिवस छोट्यांसाठीच्या' या अनोख्या कार्यक्रमाचे आमदार नितेश राणे यांनी केले उद्घाटन.
नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपक्रमाची आमदार नितेश राणेंकडून विशेष प्रशंसा.
कणकवली | ब्युरो न्यूज : कणकवलीचे नगराध्यक्ष त्यांच्या अनोख्या कल्पना व उपक्रम यासाठी प्रसिद्ध आहेत. कणकवली नगराध्यक्षांनी गेल्या साडेचार वर्षात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. तसेच एक दिवस छोट्यांसाठी हा गेली काही वर्ष राबवत असलेला उपक्रम यावर्षी मात्र नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी एका हटके स्टाईल मुळे चर्चेत आला. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. मात्र नेहमीप्रमाणे श्रीफळ वाढवून उद्घाटन करणे टाळत खाऊ गल्लीचा ” खजिना ” आमदार नितेश राणे यांनी चावी लावत उघडला आणि शेकडो मुले अक्षरशा या खजिन्यावर तुटून पडली. व त्यानंतर या खजिन्यातील लपवलेले चॉकलेट मध्ये असलेल्या चार चांदीच्या कॉईनच्या चिठ्ठ्यांसाठी सर्वांचीच उत्कंठा शिगेला ताणली. या चॉकलेट मध्ये चांदीच्या कॉइन साठी ज्या चिठ्ठ्या लपवण्यात आल्या होत्या. व त्यानंतर यातून चार जण भाग्यवान विजेते निवडले गेले. या चारही भाग्यवान विजेत्यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते चांदीचे कॉइन देऊन गौरविण्यात आले. या अनोख्या हटके स्टाईलने केलेल्या उद्घाटनाची चर्चा मात्र या कार्यक्रमात सुरू होती. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने कणकवलीतील गणपती सान्यावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवस छोट्यांसाठी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. टेंबवाडी रस्ता ते ते गणपती साण्यापर्यंत अवघा परिसर गर्दीने फुलून गेला होता. अनेक
खाद्यपदार्थांचे स्टॉल, छोट्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, मिकी माऊस, या सोबतच सेल्फी पॉइंट व गाण्यांचा नजराणा व अनेक
विविध उपक्रमांनी एक दिवस छोट्यांसाठीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने
यादगार ठरला. कणकवली नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये छोट्यांना पन्नास रुपयांचे कुपन घेण्याकरिता रांगा लागल्या होत्या. तर नदीपात्रात करण्यात आलेल्या कारंज्याने उपस्थित त्यांचे लक्ष वेधून घेतले. सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक विराज भोसले, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, अबीद नाईक, माजी नगरसेवक किशोर राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सोसायटी चेअरमन
संदीप नलावडे, बंडू गांगण, चारुदत्त साटम उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)