कला उत्सव २०२२ मध्ये वराडकर हायस्कूलचे यश..!
९ विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र.
मसुरे | प्रतिनिधी :
कला उत्सव २०२२ मध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाने वर्चस्व राखले असून राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडलेल्या १५ स्पर्धकांपैकी नऊ स्पर्धक वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 2015/ 16 पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवतात. यामध्ये शास्त्रीय गायन, पारंपरिक गायन, ताल वाद्यवादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प, खेळणी तयार करणे व नाट्य या दहा कला प्रकारांचा समावेश केलेला आहे.
जिल्हास्तरावर झालेल्या कला उत्सव स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कूल कट्टाचे विद्यार्थी कुमारी रिया विशेष भगत, इयत्ता नववी (द्विमित चित्र ) प्रतीक्षा नीलकंठ मेस्त्री, इयत्ता अकरावी (खेळणी बनवणे)वैभव अवधूत आचरेकर,इयत्ता अकरावी (त्रिमित शिल्प )ममता महेश आंगेकर,इयत्ता नववी (त्रिमित शिल्प )साक्षी रवींद्र नाईक, इयत्ता नववी( शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम ) पूर्वा रामदास चांदरकर,इयत्ता दहावी (नाट्य) द्वितीज दशरथ गव्हाणकर, इयत्ता दहावी( नाट्य)पार्थ गणेश नलावडे,इयत्ता नववी (पारंपारिक गायन )ओमकार मोहन राऊळ ,इयत्ता बारावी( वादन) हे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर अशोक चांदरकर यांनी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष माननीय अजयराज वराडकर, सल्लागार शिवानंद वराडकर, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, पाहुणे सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर क्लब चे कमलेश चव्हाण,वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)