ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.

प्रकाशन: 21 Nov 2022 10:08 AM
वाचन संख्या 91

शिरगांव | संतोष साळसकर :
कोकणातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वराला भेट द्यावी व ज्या पध्दतीने आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची पूजा आपल्या हस्ते होते त्या पद्धतीत आपण श्री देव कुणकेश्वर “ श्री ” च्या प्रथम महापूजाचा मान स्विकारावा अशी आम्हां कोकण वासीयांची मनोमन इच्छा व्यक्त करत पर्यटन विकासाकरिता जास्तीत जास्त निधीची तरतुद करावी अशी मागणी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

१८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होणाऱ्या “महाशिवरात्री” यात्रे निमित्त “श्री” च्या प्रथम महापूजेसाठी आमंत्रण पत्र देखील देण्यात आले दी. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ १२.०० वा. नंतर दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी मध्यरात्रौ ठिक ०१.०० वा. “श्री” ची प्रथम पुजा परंपरेनुसार केली जाणार आहे. कोकणातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वराला भेट द्यावी व ज्या पध्दतीने आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची पूजा आपल्या हस्ते होते त्या पद्धतीत आपण श्री देव कुणकेश्वर “ श्री ” च्या प्रथम महापूजाचा मान स्विकारावा अशी आम्हां कोकण वासीयांची मनोमन इच्छा आणि कळकळीची विनंती यावेळी करण्यात आली व पर्यटन विकासाकरिता जास्तीत जास्त निधीची तरतुद करावी असे आवाहन करण्यात आले.

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट सदस्य व पदाधिकारी व कुणकेश्वर ग्रामपंचयत सरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली भेटीच्यावेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष  लब्दे , कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत घाडी, देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, खजिनदार  अभय पेडणेकर, विश्वस्त विजय वाळके,सचिव शरद वाळके,सदस्य संजय आचरेकर, सदस्य संतोष लाड, उपस्थित होते. मुख्यमंत्री कुणकेश्वर यांना मंदिराची प्रतिमा व कोकणी मेवा भेट म्हणून देत त्यांना पुढील वाटचाली साठी देवस्थान विश्वस्त, ग्रामपंचायत , मानकरी देवसेवक व समस्थ ग्रामस्थां मार्फत हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी विधानसभा अध्यक्ष यांचे देखील भेट घेऊन कुणकेश्वर पर्यटन वाढीसाठी व आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्याची मागणी देखील विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स