आदर्श महिला बहुउद्देशीय संस्थेमार्फत कुंभारगांव येथे प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.
शिरगांव | संतोष साळसकर :
सातारा जिल्ह्यातील कुंभारगांव ग्रामपंचायतीमध्ये आदर्श महिला बहुद्देशीय संस्थेमार्फत येथील महिलांसाठी केक बनविणे , नीळ, फिनेल , डिटर्जंट पावडर , लिक्विड सोप बनविणे मसाले बनविणे ,कागदी लिफाफे कागदी पिशव्या बनविणे अशी विविध प्रशिक्षणे घेण्यात आली.
प्रशिक्षण सुरू असताना महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी योग्य असे मार्गदर्शन केले तसेच तीन दिवसीय प्रशिक्षणा मध्ये वेग वेगळ्या मान्यवरांनी भेट दिली पंचायत समिती पाटण चे ग्रामसंघाचे जिल्हा समन्वयक अमित पाटील सर, अंगणवाडी सेविका सुपरवायझर कुसुम दिक्षित , भारतीय युवा प्रतिष्ठाण कराड चे फिल्ड ऑफिसर संतोष चव्हाण यां सर्वांनी भेट देऊन दिलेल्या प्रशिक्षणाचे व आदर्श महिला संस्थेचे भरभरून कौतुक केले अश्याप्रकारे अतिशय सुंदर अशी कार्यक्रमाची सांगता झाली .प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष प्रिया आयरेकर यांनी केले .कुंभारगावच्या सरपंच सारिका पाटणकर यांनी प्रशिक्षण उत्तम प्रकारे पार पाडले यासाठी प्रशिक्षकांचे कौतुक करून पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या .सूत्रसंचालन निलम जोगडे यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)