ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण दांडी शाळेची विद्यार्थ्यांनी कु. विधिशा कुबल वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथम..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण दांडी शाळेची विद्यार्थ्यांनी कु. विधिशा कुबल वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथम..!

प्रकाशन: 19 Nov 2022 12:16 PM
वाचन संख्या 26

मसुरे | प्रतिनिधी :
रोटरी क्लब मालवण आयोजीत स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान स्व.लाल बहाद्दुर शास्त्री यांचा जीवन प्रवास या विषयावरील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये ५वी ते ७वी या गटात जि.प.पूर्ण प्राथ. शाळा मालवण दांडी शाळेची विद्यार्थीनी कु.विधिशा रामचंद्र कुबल हीने प्रथम क्रमांक मिळविला. विधिशाला डिस्ट्रिक गव्हर्नर रोटरियन श्री.व्यंकटेश देशपांडे यांच्या शुभहस्ते ट्राॅफी,प्रथम क्रमांकाचे ७००/-रु.बक्षिस व पुष्प सन्मानपूर्वक देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी असी.डिस्ट्रिक गव्हर्नर रोटरीयन नीता गोवेकर,मालवण रोटरी क्लब अध्यक्ष रो.रतन पांगे,सेक्रेटरी रो.अभय कदम.रो.डाॅ.अजित लिमये,रो.डाॅ.लिना लिमये,रो.श्री.महेश काळसेकर,रै.श्री.प्रसन्ना मयेकर, श्री.शिवराज सावंत,सहभागी विद्यार्थी व रोटरी सदस्य उपस्थित होते.
कु.विधिशा कुबल हीस दांडी शाळा पदवीधर शिक्षक श्री. शिवराज सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.तिला मिळालेल्या या यशाबद्दल मुख्या.सौ.विशाखा चव्हाण ,सौ.मनिषा ठाकुर ,श्री.रामदास तांबे,शा.व्य.समिती दांडी शाळा,पालक व ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स