चिंदर गावच्या गावपळणीतून असाही एकात्मतेचा संदेश…..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील चिंदर गावची गावपळण काल पासून सुरू झाली. तीन दिवस तीन रात्र वेशी बाहेर राहून चिंदर गावातील बहूसंख्ख ग्रामस्थ एकत्रित पणे राहातात. चिंदर अपराजवाडी आणि पडेकाप येथील ग्रामस्थ त्रिंबक माळरानावर, कोंडवाडी ग्रामस्थ कुडोपी भागात, भटवाडी-देऊळवाडी येथील ग्रामस्थ आचरा माळरानावर, लब्देवाडी साटमवाडी ग्रामस्थ बांदिवडे मळा भागात तर भगवंतगड-तेरई येथील ग्रामस्थ मसुरे मळाभागात झोपडी-राहुट्या उभारून राहातात.
यावेळी फुगड्या, शिमग्याचा नाच, भेंड्या, पाककला असे अनेक करमणूकीचे खेळ खेळतात सादर करतात. याच बरोबर ते भजनी कलेचा वारसा जपत हरीनामातही तल्लिन होतात. याच बरोबर अनेक वेळा गावात राहुन कधी झालेले असंमज्यस्याचेही विषय मिटून ममत्वभाव निर्माण होतो. बहुतांशी ठिकाणी सर्व मिळून एकत्रित जेवन बनवने व सर्वमिळू एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतात. या सर्वातून गावपळण पंरपरेतून जगाला एकात्मतेचा संदेशही दिला जातो.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)