ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कट्टा परिसरातील १०० बालकांना स्वेटरचे वाटप..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कट्टा परिसरातील १०० बालकांना स्वेटरचे वाटप..!

प्रकाशन: 18 Nov 2022 01:38 PM
वाचन संख्या 35

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या माध्यमातून वितरण.

मसुरे | प्रतिनिधी :

बॅ.नाथ पै सेवागण कट्टा, हडपीवाडी,कावळेवाडी, कुसरवे या ठिकाणी स्वंयसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने सुमारे शंभर बालकांना स्वेटर वाटप करण्यात आले. सौ प्रतिभा हुल्याळकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले.


यावेळी वैष्णवी लाड म्हणाल्या, सौ प्रतिभा हुल्याळकर यांनी या थंडीमध्ये चांगल्या प्रतीची स्वेटर देऊन अनेक बालकाना मायेची पाखरच घातली आहे.त्या बद्दल सर्वानी त्यांचे व ज्यांच्यामुळे ही मदत आपणास मिळाली त्या रोटरीयन रश्मी पाटील यांच्याविषयी कृतज्ञ राहायला हवे. सेवांगणच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. स्वयंसेविकांच्या समन्वयक
सौ .नाईक यानी सर्व बालक व पालक यांच्यावतीने सौ .प्रतिभा हुल्याळकर यांचे आभार मानले. व सेवांगण आता नवजात बालकांसाठी सुद्धा उपक्रम राबवतय याचा आनंद वाटतोय असे सांगितले. सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी श्रीमती हुल्याळकर यानी अत्यंत चांगल्या प्रतीची स्वेटर खास करून ग्रामीण भागातील बालकांसाठी दिली आहेत. त्यासाठी नेहमीच मुंबईहून कायमच मदत मिळवण्यासाठी तत्पर असणाच्या रश्मी पाटील यांच्यामार्फत देण्यात आली आहेत.प्रतिभा हुल्याळकर व रश्मी पाटील यांचे आभार मानून त्यानी यापुढेही वेगवेगळ्या माध्यमातून मदत मिळवण्याचा प्रयत्न राहील असे सांगितले.यावेळी १०० बालकाना
स्वेटर, कानटोपी, विजार व बिस्किट पुडा भेट देण्यात आला.या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, वैष्णवी लाड, सुजाता पावसकर, सौ नाईक, सौ ढोलम, रीटा डान्टस, अंगणवाडी सेविका वेंगुलेकर, आपा परब, मिठबावकर, देवीदास गोंधळी, चंद्रकांत घोगळे, अंगणवाडी सेविका, वर्कस व महिला उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स