ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सायकलपट्टू रमेश गावडे यांना ब्युटीज ऑन व्हीलसच्या सदस्यांनी दिल्या शुभेच्छा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सायकलपट्टू रमेश गावडे यांना ब्युटीज ऑन व्हीलसच्या सदस्यांनी दिल्या शुभेच्छा..!

प्रकाशन: 18 Nov 2022 11:32 AM
वाचन संख्या 26

मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग सफर.

मसुरे | प्रतिनिधी :
मुंबई ते कन्याकुमारी असा १६५० किमी सायकलिंग प्रवास करण्यास निघालेल्या श्री.रमेश गावडे यांची ब्युटीज ऑन व्हीलसच्या सदस्यांनी ओरोस येथे भेट घेवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
गावडे हे मुळ चौके गावचे असून सध्या मुंबई इन्कम टॅक्स विभागात नोकरीस आहेत. ४७२ कि.मी अंतर पूर्ण करून ते ओरोस येथे आले असता ब्युटीज ऑन व्हीलस ग्रुपच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. गावडे हे नेहमी सायकलिंग करत असतात आणि ते इतरांनाही प्रेरणा देत असतात.आता पर्यंत त्यांनी ब-याच सायकलिंग राईड पूर्ण केलेल्या आहेत.त्यामध्ये पाचशे किमी पर्यंत अनेक छोट्या मोठ्या तसेच मुंबई ते मालवण अशा राईड पूर्ण केलेल्या आहेत. सायकलिंग द्वारे मुले सुदृढ राहावीत हा संदेश देण्यासाठी सदर सायकल सफर करत असल्याचे गावडे म्हणाले. यावेळी ब्युटीज ऑन व्हीलसचे डॉ. सोमनाथ परब, निलेश झाटये, प्रकाश सरमळकर, सुरेश कांबळी, अमेय चव्हाण, दुर्गेश मडवळ, निलेश हडकर, नवनीत परब आदी सदस्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स