ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत तळेरे नं.१ शाळेचे नेत्रदिपक यश..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत तळेरे नं.१ शाळेचे नेत्रदिपक यश..!

प्रकाशन: 17 Nov 2022 12:33 PM
वाचन संख्या 38

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध चित्रकला स्पर्धेत कणकवली तालुक्यातील जि. प. आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना १७ सुवर्ण, ४ रौप्य व ५ कास्य पदके प्राप्त झाली आहेत. तर कु.अर्णव शैलेश सुर्वे हा विद्यार्थी तब्बल ३ सुवर्ण पदकांचा मानकरी ठरला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्षा सिद्धी साटम, माजी अध्यक्ष व शिक्षणप्रेमी सदस्य शशांक तळेकर व सर्व सदस्य यांनी हार्दिक अभिनंदन करून कौतुक केले. सदर चित्रकला स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक श्री. सत्यवान शांताराम चव्हाण गुरुजींचे विशेष मार्गदर्शन लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स