ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुंबईत गोवरचा कहर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक.

मुंबईत गोवरचा कहर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक.

प्रकाशन: 17 Nov 2022 12:13 PM
वाचन संख्या 36

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
मुंबईत गोवर संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज बोलावली आहे. यंदा सप्टेंबरपासून गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतल्या गोवरच्या रुग्णांच्या संख्येतली वाढ ही मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे.
या बैठकीला सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव यांच्यासह आरोग्य विभागातील अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी १२ वाजता आहे. ती झाल्यानंतर ही बैठक होईल. यामध्ये गोवर आजारावरच्या प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील सूचना देतील.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सहा बालके ऑक्सिजनवर आहेत. सोमवारी गोवरचे १२ रुग्ण आढळून आलेय. सध्या मुंबईत या रोगाचे १६४ रुग्ण आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतल्या रुग्णांच्या संख्येत १७ पटींनी वाढ झाली आहे. मुंबईतल्या गोवर रुग्णांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स